संतोष कानडे
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा सिनेमा येत आहे. या सिनेमातील नृत्यांवरुन वाद निर्माण झाला होता
मात्र सिनेमातील संभाजी महाराजांच्या नृत्याचे सीन कापणार असल्याचे दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं आहे
अनेक अभ्यासकांचा दावा आहे की भरतनाट्यम् या नृत्याच्या आधुनिक अवताराचा उगम संभाजी महाराजांच्या ‘नायिकाभेद’ या ग्रंथातून झाला असावा.
भरतनाट्यम ही अतिशय प्राचीन अशी शास्त्रीय नृत्यशैली आहे. २ हजार वर्षांपूर्वी भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्र ग्रंथात याचा उल्लेख आहे
तामिळनाडू प्रांतातील तंजावूर येथे शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले यांच्या वंशजांनी अनेक वर्षे राज्य केले. संभाजी महाराजांशी या घराण्याचे चांगले संबंध होते.
छत्रपती संभाजी महाराज हे कलाप्रेमी होते, हे इतिहासातील दाखल्यांवरुन स्पष्ट होतंय