सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण कायम ठेवत देवस्थाने, मठ आणि संतांना पूर्वीप्रमाणेच मदत दिली.संत तुकाराम यांचा वारसा जपला
पुण्याच्या विनायक उमाजी देशाधिकाऱ्याला आदेश देऊन संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादोबा यांना वार्षिक अनुदान मंजूर केले.
कुडाळ प्रांतात मौनी गोसावींच्या शिष्याच्या सेवेसाठी गणीराम देशाधिकाऱ्याला १२५ होन देण्याचा आदेश दिला.
कन्हेरी मठातील वासुदेव गोसावींसाठी जमीन वाटप करून निरथडी, मांढरदेवी आणि जावळीतील जागा दान केल्या.
रामदासस्वामी व त्यांच्या शिष्यगणांचा सन्मान राखत सातारा, चाफळ आणि सज्जनगड येथील रामदासी मठांच्या व्यवस्थेत सुधारणा केली.
अधिकाऱ्यांना श्रीराम उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी आदेश देऊन धार्मिक परंपरा आणि विधी जपण्यावर विशेष भर दिला.
कऱ्हाड येथील वेदशास्त्री नरसीभट, अनंत भट आणि महाबळेश्वरचे राम भट यांना आर्थिक मदत व जोंधळे-तांदूळ प्रदान केले.
हिंदू संस्कृती आणि संत परंपरेला राजाश्रय देत धार्मिक स्थळे आणि साधू-संतांसाठी आर्थिक मदतीचा वारसा कायम ठेवला.