Shubham Banubakode
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपलं दैवतच...
या दैवतानं ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर अखेरचा श्वास घेतला.
निधनानंतर शिवरायांच्या पार्थिवावर युवराज राजाराम राजेंनी अंत्यसंस्कार केले.
तसेच शिवरक्षा व अस्थी जगदीश्वर देवळाजवळ पुरण्यात आल्या.
या घटनेला आता जवळपास ३५० ते ४०० वर्ष उलटून गेली आहेत.
पण तुम्हाला कुणी म्हटलं की शिवरायांच्या अस्थी आजही जपून ठेवल्या आहेत? तर.....
हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, पण हे खरं आहे.
महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावल्यानंतर या समाधीचा जिर्णोद्धार करण्याची घोषण केली होती.
जिर्णोद्धाराच्या प्रत्यक्ष कामाला जेव्हा सुरवात झाली. तेव्हा शिवरायांच्या समाधी ठिकाणी खोदकाम करण्यात आलं.
यावेळी मजुरांना एका पेटीत शिवछत्रपतींच्या अस्थी आणि रक्षा मिळून आल्या.
यावेळी कंत्राटदार सुळे, रायगड स्मारक समितीचे सदस्य महादेव वडके आणि जेष्ठ लेखक गो.नी.दांडेकर यांनी छत्रपतींच्या रक्षेपैकी थोडीफार रक्षा काढून घेतली.
याशिवाय कोल्हापूरच्या राजवाड्यात शिवरक्षेचा काही भाग पाठवण्यात आला.
कोल्हापूरच्या छत्रपतींनी यासंदर्भात लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे.
कोल्हापूरच्या याच राजवाड्यात आजही या अस्थी जपून ठेवल्या आहेत.