सकाळ वृत्तसेवा
स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी रयतेच्या भल्यासाठी अनेक निर्णय घेतले. त्याचवेळी जीवनावश्यक वस्तूंवर आणि व्यवहारांवर करप्रणाली देखील अस्तित्वात होती.
स्वराज्यात विविध भागांतून येणाऱ्या वस्तूंवर जकात आकारला जात होता. यात अन्नधान्य, मसाले, टोप्या ते काचेच्या वस्तूंपर्यंत सर्वांवर कर आकारला जातो.
सूत, कापड, छोट्या होड्या, बैलगाड्या आणि पालख्या यावरही कर आकारला जाई. या करामुळे स्वराज्यासाठी उत्पन्न निर्माण होत असे.
विवाह समारंभांवर ‘लग्नटका’ किंवा ‘वराडटक्का’ नावाचा कर घेतला जाई. हे सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे प्रसंग सरकारसाठीही उत्पन्नाचं साधन होते.
पुनर्विवाह केल्यास 'पाट लावणे' यासाठी 'पाटदाम' नावाचा कर वसूल केला जात असे. हा कर विशिष्ट सामाजिक घटनांशी जोडलेला होता.
प्रत्येक घरमालकाला ‘घरटक्का’ कर भरावा लागत असे. घराच्या मालकीवर आधारित हा कर रयतेकडून घेतला जात होता.
शिंगे असलेल्या प्राण्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांना ‘शिंगोटी’ नावाचा कर द्यावा लागत असे. प्राणी व्यापारालाही आर्थिक चौकट होती.
मीठ या अत्यावश्यक वस्तूवर देखील स्वराज्यात कर आकारला जात होता. या करांचे संकलन प्रशासनासाठी आर्थिक आधार ठरत असे.