जगन्नाथ पुरी आजारी का पडतात?

Monika Shinde

स्नान यात्रा

दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान जगन्नाथ यांना पवित्र जलस्नान घालण्यात येतो. हा दिवस स्नान यात्रा म्हणून साजरा केला जातो.

स्नानानंतर आजारपण सुरू

या दिवशी स्नानानंतर भगवान आजारी पडतात. त्यांना ताप येतो आणि ते अशक्त होतात.

१५ दिवस विश्रांती

भगवान जगन्नाथ १५ दिवस दर्शन देत नाहीत. मंदिराचे दरवाजे बंद राहतात आणि विशेष सेवा होते.

औषधे व आहार

या काळात त्यांना फक्त फळांचे रस, उकडीचे औषध व दलिया दिले जाते.

पारंपरिक कथा

एकदा माधवदास नामक भक्त आजारी पडले. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन जगन्नाथ स्वयं सेवक बनले.

भगवानांनी घेतले आजार

माधवदास म्हणाले, "माझे नशिबी १५ दिवस आजार उरलेत." भगवान म्हणाले, "ते आजार मी घेतो!" त्यानंतरपासून ते दरवर्षी आजारी पडतात.

मंदिर बंद, भक्त प्रतीक्षा करतात

या १५ दिवसांत मंदिरात पूजा होते पण दर्शन बंद असते. भक्त मोठ्या श्रद्धेने प्रतीक्षा करत असतात.

रथयात्रा

१५ दिवसांनी भगवान पुन्हा स्वस्थ होतात आणि आषाढ शुद्ध द्वितीला भव्य रथयात्रा काढली जाते.

पारंपरिक श्रद्धा आणि भक्तीचा संगम

ही परंपरा शतकानुशतकांपासून सुरू आहे. ती भक्ती, समर्पण आणि परमेश्वराच्या माणुसकीचा प्रतीक आहे.

पंढरीला निघण्यापूर्वी वारकऱ्यांनी करावी 'ही' वैद्यकीय तपासणी

येथे क्लिक कर...