शिवराय अजिंक्यतारा किल्ल्यावर 2 महिने का थांबले होते?

Aarti Badade

अजिंक्यतारा किल्ला

सातारा शहराला वेढणाऱ्या सात डोंगरांपैकी एका डोंगरावर वसलेला अजिंक्यतारा किल्ला सुमारे ८३६ वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते.

Ajinkyatara

|

Sakal

किल्ल्याची निर्मिती कधी झाली?

ऐतिहासिक माहितीनुसार, शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने इ.स. ११९० मध्ये अजिंक्यतारा किल्ल्याची निर्मिती केली.

Ajinkyatara

|

Sakal

साताऱ्याची ऐतिहासिक ओळख

सातारा शहराच्या वैभवात भर घालणारा अजिंक्यतारा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे स्थान मानला जातो.

Ajinkyatara

|

Sakal

छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला

छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ जुलै १६७३ रोजी आदिलशाहीकडून अजिंक्यतारा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला.

Ajinkyatara chhatrapati shivaji maharaj

|

Sakal

किल्ल्यावर महाराजांचा मुक्काम

इ.स. १६७५ ते १६७६ या काळात आजारपणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर सुमारे दोन महिने विश्रांती घेतल्याचे सांगितले जाते.

Ajinkyatara chhatrapati shivaji maharaj

|

Sakal

मराठा साम्राज्याची चौथी राजधानी

राजगड, रायगड आणि जिंजी यांच्यानंतर अजिंक्यतारा किल्ल्याला मराठा साम्राज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखले जाते.

Ajinkyatara chhatrapati shivaji maharaj

| esakal

इतिहासाचा साक्षीदार अजिंक्यतारा

अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असलेला अजिंक्यतारा किल्ला आजही साताऱ्याच्या ऐतिहासिक वारशाची आणि मराठ्यांच्या शौर्याची आठवण करून देतो.

Ajinkyatara

|

Sakal

पुणे शहराचं नाव कसं पडलं?

Pune name history

|

Sakal

येथे क्लिक करा