नाशिकमधल्या 'या' छोट्या गावात राहतात छत्रपतींच्या भोसले घराण्याचे वंशज

Pranali Kodre

वावी:

नाशिक जिल्ह्यातील वावी गावात शिवरायांच्या पूर्वजांची गढी होती; आज तिचे थोडे अवशेष उरले आहेत.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

बाबाजी भोसले

बाबाजी भोसले यांच्याकडे ८ गावांची पाटीलकी होती. त्यांच्या मुलांपैकी मालोजी हे शिवरायांचे आजोबा.

Sakal

विठोजी भोसले व वावीचा अधिपत्य

धाकट्या विठोजी भोसलेंना आठ गावे मिळाली. त्यांनी आपल्या आठ मुलांना एकेक गाव दिलं. नागोजी यांना वावी मिळालं आणि वावीत भोसले घराण्याचा पाया रचला गेला.

Vithoji Bhosale | Sakal

शिवाजी महाराज व वावीतील नातलग

शिवाजी महाराज सुरत लुटीतून परतताना विश्रामगडावर थांबले आणि वावीतील नातलगांना भेटले, असं वंशज सांगतात.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

वावीचा अर्थ आणि यादवकालीन इतिहास

वावी म्हणजे बारव. यादवकालीन शिलालेख, चक्रधर स्वामींच्या लिखाणात याचा उल्लेख. बारव अजूनही मंदिरासमोर अस्तित्वात आहे.

The Bhonsle Legacy of Wavi | Sakal

वैजेश्वर मंदिर आणि वारसा

वावीतील वैजेश्वर महादेव मंदिर हे यादवकालीन असून, पंचमुखी मुखवटा आजही जतन केला जातो. पुरातन मंदिराचा दगडी स्तंभ वारशाची साक्ष देतो.

The Bhonsle Legacy of Wavi | Sakal

भोसले वाड्यांचे अवशेष

वावीतील तीन भोसले वाड्यांपैकी एक वाडा अजूनही उभा आहे. उंच बुरूज, भुयार आणि कोरीव दगडी अवशेष इतिहास जपताना दिसतात.

The Bhonsle Legacy of Wavi | Sakal

शाहू राजेंचे दत्तकत्व व गौरव

शाहू राजे दुसरे (आबासाहेब) हे वावी घराण्यातून साताऱ्याच्या गादीवर गेले. पण हा गौरवशाली इतिहास अजूनही अंधारात राहिला आहे.

The Bhonsle Legacy of Wavi | Sakal

ऐश्वर्यशाली तलवारी आणि हरवलेला वारसा

शहाजी राजांकडून मिळालेल्या तलवारी – एक दशावतार कोरलेली, दुसरी सोन्याच्या मूठीची. पण या ऐश्वर्याचा ठावठिकाणा आज नाही.

Shahaji Maharaj | Sakal

मस्तानीच्या माहेरी आजही सापडते हीऱ्यांची खाण, बाजीराव पेशव्याने...

Mastani | Sakal
येथे क्लिक करा