कसा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव?

Sandip Kapde

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेबाबत इतिहासातील विविध चित्रे महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करतात.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed- | esakal

ब्रिटिश म्युझियम

ब्रिटिश म्युझियममधील १७०७ च्या चित्रात काळी दाढी, मिशा आणि कानावर लांब झुलपे स्पष्टपणे दिसतात.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal

सोनेरी पगडी

या चित्रात शिवरायांनी सोनेरी पगडी परिधान केली असून, हिरेजडीत शिरपेच आणि काळा तुरा मिरवले आहेत.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal

जांभळा रेशमी शेला

अंगावर पांढरा लेंगा, फुलांचा अंगरखा आणि खांद्यावर जांभळा रेशमी शेला होता.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal

प्रिन्स ऑफ वेल्स

प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममधील चित्र ब्रिटिश म्युझियममधील चित्राशी बरेच साम्य दर्शवते.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal

शिरपेच

ऑर्मच्या चित्रांत मिशांची ठेवण, शिरपेच, तुरा आणि अंगरखा थोडा वेगळा आहे.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal

कंठमणी

या चित्रात मोत्याचा कंठा आणि छातीवरील कंठमणी दिसतात.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal

तलवार

शिवरायांच्या हातात तलवार, कमरेत कट्यार आणि पट्टा होता.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal

वर्णन

शिवभारतकार परमानंद यांनी शिवरायांच्या पेहरावाचे वर्णन कवच, शिरखाण आणि तलवार अशा तपशिलांमध्ये केले आहे.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal

परमानंद

परमानंद यांच्या वर्णनात रत्नजडीत अलंकार आणि तेजस्वी घोड्याचे उल्लेख आहेत.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal

जिरेटोप

चित्रगुप्ताच्या बखरीत शिवरायांच्या डोक्यावर जिरेटोप, अंगावर बखर आणि झगा असल्याचे म्हटले आहे.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal

मोत्यांची कुंडले

कानांत मोत्यांची आकर्षक कुंडले, गळ्यांत जडवांची देखणी पदके आणि शोभिवंत भरजरी मंदील यांचाही उल्लेख आहे.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal

आडवे केशरी गंध

चित्रगुप्ताच्या वर्णनात कमरेला बांधलेला पटका, बुट्टेदार सुरवार आणि कपाळावर आडवे लावलेले केशरी गंध यांचा उल्लेख आहे.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal

अलंकार

शिवरायांच्या पोशाखात नेहमीच भरजरी वस्त्रांचा आणि अलंकारांचा समावेश असे.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal

संदर्भ

शिवरायांचे प्रत्येक पोशाख त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तेजस्वी भाग बनले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिवकाल ग्रंथात ही माहिती दिली आहे.

How was Chhatrapati Shivaji Maharaj dressed | esakal

बाबासाहेबांचे भाषण सुरु असताना गाडगेबाबांना व्यासपीठाखाली रोखल्याचा प्रसंग काय?

Babasaheb Ambedkar and gadge maharaj | Esakal
येथे क्लिक करा