सकाळ डिजिटल टीम
आज बाबासाहेब आंबेडकरांचा ६८वा महापरिनिर्वाण दिवस आहे.
त्यानिमित्त बाबासाहेबांचे अंगरक्षक राहिलेल्या नामदेण सवणे यांचा मुलगा राहुल सवणे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
राहुल सवणे यांनी मुंबईतील बाबासाहेब आंबेडकरांच्या सभेतील एक प्रसंग सांगितला आहे.
एकदा मुंबईत बाबासाहेबांची सभा होती. सभेमध्ये नेमके बाबासाहेबांचे भाषण सुरु झाले होते.
त्याचवेळी व्यासपीठाच्या बाजुला पायऱ्यांवर नामदेव सवणे हे समता सैनिक म्हणून बंदोबस्तासाठी उभे होते.
बाबासाहेबांचे भाषण सुरु असताना साहजिक अशावेळी व्यासपीठावर कोणालाही जाऊ न देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
नेमकं याचवेळी संत गाडगेबाबांचे सभास्थळी आगमन झालं.
नामदेव सवणे यांनी गाडगेबाबांना व्यासपीठावरून जाण्यापासून रोखले.
यावेळी बाबासाहेबांनी आपले भाषण थांबवत गाडगेबाबांना व्यासपीठावर घेण्यासाठी खाली आले.
त्यामुळे नामदेव सवणे घाबरले. आपले काही चुकले की काय असे त्यांना वाटले.
मात्र, बाबासाहेबांनी व गाडगेबाबांनीदेखील, घाबरू नकोस मुला, तू तुझे काम केलेस. अशा शब्दात आधार दिला, असे राहुल सवणे यांनी सांगितलं.