शिवरायांचे शूर मावळे... ज्यांची नावे ऐकताच आठवतात 'हे' ऐतिहासिक गड!

Aarti Badade

स्वराज्याचे शूर मावळे!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी प्राणांची बाजी लावली आणि आपल्या पराक्रमाने इतिहासात अढळ स्थान मिळवले.

Shivaji Maharaj Mavle Brave Warriors fort connections

| esakal

तानाजी मालुसरे – सिंहगड

तानाजी मालुसरे यांनी प्राणांची पर्वा न करता कोंढाणा किल्ला जिंकला आणि त्यांच्या बलिदानानंतर या गडाला सिंहगड हे नाव मिळाल्याची प्रसिद्ध परंपरा आहे.

Shivaji Maharaj Mavle Brave Warriors fort connections

| esakal

बाजीप्रभू देशपांडे – पावनखिंड

महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत शत्रूला रोखून धरले आणि त्यांच्या बलिदानामुळे ती पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली.

Shivaji Maharaj Mavle Brave Warriors fort connections

|

Sakal

मुरारबाजी देशपांडे – पुरंदर

पुरंदरच्या लढाईत दिलेरखानाच्या सैन्याशी धैर्याने सामना करत मुरारबाजी देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

Shivaji Maharaj Mavle Brave Warriors fort connections

|

Sakal

यसाजी कंक – पन्हाळा आणि प्रतापगड

शिवरायांचे विश्वासू सहकारी आणि पायदळाचे सरनोबत असलेल्या यसाजी कंक यांनी स्वराज्याच्या अनेक मोहिमांमध्ये शौर्य गाजवले.

Shivaji Maharaj Mavle Brave Warriors fort connections

|

sakal

हिरोजी इंदुलकर – रायगड

रायगड किल्ल्याच्या उभारणीत आणि स्वराज्याच्या राजधानीतील महत्त्वाच्या वास्तूंच्या निर्मितीत हिरोजी इंदुलकर यांचे मोठे योगदान होते.

Hiroji Indulkar shivaji maharaj story | esakal

फिरंगोजी नरसाळा – चाकण

शाहिस्तेखानाच्या प्रचंड सैन्याविरुद्ध चाकणच्या संग्रामदुर्गावर फिरंगोजी नरसाळा यांनी सुमारे ५६ दिवस किल्ला लढवून पराक्रम गाजवला.

Shivaji Maharaj Mavle Brave Warriors fort connections

|

Sakal

कोंडाजी फर्जंद – पन्हाळा

अवघ्या मोजक्या मावळ्यांच्या साथीने कोंडाजी फर्जंद यांनी धाडसी मोहिम आखून पन्हाळा किल्ला जिंकला आणि इतिहासात आपले नाव कोरले.

Shivaji Maharaj Mavle Brave Warriors fort connections

|

Sakal

जास्त बडबड करणाऱ्या लोकांबद्दल काय सांगतात चाणक्य?

chanaky niti

|

Sakal

येथे क्लिक करा