शिवराज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याच्या पट्टराणी कोण होत्या?

Pranali Kodre

शिवाजी महाराजांच्या पट्टराणी कोण होत्या?

हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या ‘त्या’ महाराणीची ओळख करून घेऊया.

Chhatrapati Shavaji Maharaj | Sakal

सोयराबाई मोहिते – महाराजांच्या पट्टराणी!

सोयराबाई मोहिते – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पट्टराणी! त्यांचा विवाह महाराजांशी इ.स. १६५० च्या सुमारास झाला होता.

Chhatrapati Shavaji Maharaj wife Soyarabai Bhosale | Sakal

मोहिते घराण्यातील तेजस्वी कन्या

सोयराबाई मोहिते या नामांकित मोहिते घराण्यातील होत्या. त्यांचे भाऊ स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते होते.

Chhatrapati Shavaji Maharaj wife Soyarabai Bhosale | Sakal

भोसले-मोहिते घराण्यांचे जुने नाते

शहाजीराजेंपासून मोहिते आणि भोसले घराण्यांमध्ये नाते होते. संभाजी मोहिते यांच्या बहिणी तुकाबाई या शहाजीराजांच्या पत्नी होत्या.

Shahaji Raje Bhosale | Sakal

राज्याभिषेकावेळी विशेष मान

३० मे १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी, सोयराबाई यांना पट्टराणीचा मान देण्यात आला.

Chhatrapati Shavaji Maharaj wife Soyarabai Bhosale | Sakal

समंत्रक विवाह विधी

त्याच दिवशी महाराजांचा समंत्रक विवाह विधी सोयराबाई यांच्याशी पुन्हा करण्यात आला. हा विवाह 'राज्यपत्नी' म्हणून त्यांची अधिकृत स्थापना दर्शवत होता.

Chhatrapati Shavaji Maharaj | Sakal

संतती

सोयराबाई यांना एक मुलगी – दीपाबाई (१६६५ सुमारास) आणि एक पुत्र – राजाराम महाराज (२४ फेब्रुवारी १६७० रोजी) झाले.

Chhatrapati Shavaji Maharaj wife Soyarabai Bhosale | Sakal

सभासद बखरातील उल्लेख

“मोहित्यांची कन्या सोयराबाई गरोदर होती, तीस पुत्र जाहला” ही राजाराम महाराजांच्या जन्माची साक्ष देणारी ऐतिहासिक नोंद आहे.

Chhatrapati Shavaji Maharaj wife Soyarabai Bhosale | Sakal

पद आणि जबाबदारी

पट्टराणी म्हणून सोयराबाई यांना दरबारात मान होता. त्यांनी स्वराज्याच्या राजपरंपरेत महत्त्वाची भूमिका बजावली.

Chhatrapati Shavaji Maharaj wife Soyarabai Bhosale | Sakal

शिवराज्याभिषेकाच्या वेळी सिंहासनाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कोण बसलं होतं?

Chhatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek | Sakal
येथे क्लिक करा