Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राबरोबरच दक्षिण भारतातही किल्ल्यांचे साम्राज्य उभारले होते. तामिळनाडूमधील वेल्लोरजवळचा 'साजरा-गोजरा' किल्ला त्यापैकीच एक महत्त्वाचा दाखला आहे.
वेल्लोरचा बलाढ्य भुईकोट किल्ला जिंकण्यासाठी महाराजांनी आपल्या रणनीतीचा उपयोग करत 'साजरा' व 'गोजरा' हे दोन डोंगरी किल्ले उभारले.
साजरा किल्ल्याच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पहारेकऱ्यांच्या चौक्या दिसतात. आजही त्या भिंती, तुटक्या पण ठाम उभ्या आहेत.
चौकीच्या उजव्या कोपऱ्यातील खांबावर, अगदी छताजवळ कोरलेले एक अनमोल शिल्प आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे.
साजरा किल्ल्यावर कोरले गेलेले हे शिल्प म्हणजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचेच! हे शिवचरित्र जिवंत करणारे कोरीवकाम आहे.
शिल्पामध्ये महाराज घोड्यावर आरूढ असून, घोडा दोन्ही पाय उचलून उभा आहे. महाराजांच्या हातात लगाम व भाला असून चेहऱ्यावर तीव्रतेची झलक आहे.
हे शिल्प शिवाजी महाराजांच्या हयातीत, म्हणजे त्यांचं अस्तित्व असताना कोरले गेलेले आहे. ही एक ऐतिहासिक खासियत आहे.
महाराजांचा चेहरा, टोप, दाढी आणि भाल्याचा युद्धसज्ज पवित्रा हे शिल्प युद्धातील क्षणाची जणू जिवंत आठवण करून देतो.
साजरा किल्ल्यावरील शिल्प हे शिल्प म्हणजे केवळ एक कोरीव काम नसून, शिवकालीन दक्षिण मोहिमेची आणि महाराजांच्या सामर्थ्याची साक्ष आहे.