Saisimran Ghashi
टिगिरियाचे राजा ब्रजराज क्षत्रिय बिर्बर चंपुपती सिंह मोहोपात्रा हे ब्रिटिश भारतातील प्रसिद्ध प्लेबॉय राजे होते.
त्यांच्याकडे २५ व्हिंटेज गाड्या होत्या. हत्तीवरून प्रवास, सिंहाची शिकार आणि महालात आलिशान जीवन असा त्यांचा दैनंदिन दिनक्रम होता.
१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि टिगिरिया संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले. त्यामुळे करांचा महसूल बंद झाला.
त्यांना सरकारकडून फक्त ११,२०० रुपये वार्षिक पेन्शन मिळू लागली. खर्च भागवण्यासाठी त्यांनी आपला महाल विकला.
ब्रजराजसिंह यांनी विकलेला महाल आता एका मुलींच्या हायस्कूलमध्ये रूपांतरित झाला आहे.
इंदिरा गांधी सरकारने शाही सवलती रद्द केल्यावर त्यांची पेन्शनही थांबली. त्यामुळे ते पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले.
राजा ब्रजराजसिंह अखेरच्या काळात आपल्या कुटुंबापासून दूर, गावातल्या चिखलाच्या घरात एकटे राहू लागले.
नोव्हेंबर २०१५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारांची व्यवस्था गावकऱ्यांनीच केली.
त्यांची पत्नी रसमनजरी देवी या माजी आमदार आहेत. त्यांना तीन मुलगे आहेत. पण राजा ब्रजराजसिंह यांचे आयुष्य एक शोकांतिका ठरले.