Shivaji Maharaj Forts : 80 अंशाच्या उभ्या पायऱ्या अन् खोल दऱ्या! 'ट्रेकर्सं'च्या छातीची धडधड वाढवणारे सह्याद्रीतील 'हे' 5 किल्ले

बाळकृष्ण मधाळे

सह्याद्रीतील आव्हानात्मक किल्ले

सह्याद्री म्हटलं की इतिहास, पराक्रम आणि निसर्ग डोळ्यांसमोर येतो. मात्र, काही किल्ल्यांची चढाई आजही ट्रेकर्सच्या शारीरिक आणि मानसिक ताकदीची कसोटी पाहते.

Chhatrapati Shivaji Maharaj forts

|

esakal

राजगड किल्ला

राजगडाचा परिसर विस्तीर्ण आहे. पद्मावती, संजीवनी आणि इतर माच्यांवर फिरताना मोठ्या प्रमाणात चढ-उतार करावे लागतात. त्यामुळे राजगडासाठी उत्तम स्टॅमिना आवश्यक आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj forts

|

esakal

हरिहर किल्ला

खडकात कोरलेल्या जवळपास ८० अंशाच्या पायऱ्या ही हरिहर किल्ल्याची खासियत. दोन्ही बाजूंना खोल दऱ्या आणि अरुंद चढाईमुळे येथे ट्रेकर्सच्या धैर्याची कसोटी लागते.

Chhatrapati Shivaji Maharaj forts

|

esakal

लिंगाणा किल्ला

दुरून शिवलिंगासारखा दिसणारा लिंगाणा किल्ला अत्यंत कठीण चढाईसाठी ओळखला जातो. सरळ कातळ आणि खोल दऱ्यांमुळे अनुभवी ट्रेकर्ससाठीही हा ट्रेक आव्हानात्मक ठरतो.

Chhatrapati Shivaji Maharaj forts

|

esakal

प्रतापगड किल्ला

जावळीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या प्रतापगडाच्या परिसरात जंगल, चढ-उतार आणि खोल दऱ्या आहेत. पावसाळ्यात निसरड्या वाटांमुळे ट्रेकिंग करताना विशेष काळजी घ्यावी लागते.

Chhatrapati Shivaji Maharaj forts

|

esakal

तोरणा किल्ला

विशाल डोंगरावर वसलेला तोरणा किल्ला खडकाळ वाटा आणि दमछाक करणाऱ्या चढाईसाठी ओळखला जातो. पावसाळ्यात धुकं, वारा आणि निसरड्या वाटांमुळे हा ट्रेक अधिक रोमांचक बनतो.

Chhatrapati Shivaji Maharaj forts

|

esakal

ट्रेकर्ससाठी मोठी कसोटी

लिंगाणा, हरिहर, राजगड, तोरणा आणि प्रतापगड हे किल्ले केवळ पर्यटनस्थळे नाहीत, तर ट्रेकिंगची खरी कसोटी पाहणारे गड आहेत. योग्य तयारी, अनुभव आणि सुरक्षिततेची साधने घेऊनच ट्रेक करणे महत्त्वाचे.

Chhatrapati Shivaji Maharaj forts

|

esakal

इतिहास अनुभवायचा, तर गड-किल्ल्यांची वाट धरावी

या किल्ल्यांवरचा प्रत्येक ट्रेक इतिहास, निसर्ग आणि साहसाचा अनोखा अनुभव देतो. मात्र, किल्ले सर करताना निसर्गाचे संवर्धन आणि स्वतःची सुरक्षितता यांना नेहमीच प्राधान्य द्या.

Chhatrapati Shivaji Maharaj forts

|

esakal

Crow Lifespan : कावळ्याला म्हातारं होण्यासाठी किती वर्षे लागतात? जाणून घ्या आयुष्याचं गुपित

Crow Lifespan

|

esakal

येथे क्लिक करा...