Aarti Badade
अहमदनगर जिल्ह्यातील पेडगाव येथे भीमा नदीच्या काठी वसलेला बहादूरगड हा एक मजबूत भुईकोट किल्ला असून, याला आता 'धर्मवीर गड' म्हणूनही ओळखले जाते.
Dharmveer Gad (Bahadurgad) history
Sakal
देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधलेला हा किल्ला पुढे मुघलांच्या ताब्यात गेला; औरंगजेबाचा दूधभाऊ बहादूरखानाने याची डागडुजी केल्यावर याचे नाव 'बहादूरगड' पडले.
Dharmveer Gad (Bahadurgad) history
Sakal
सन १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून बहादूरखानाला २५ कोस लांब पळवले आणि गडातील २०० अरबी घोडे व खजिना हस्तगत केला.
Dharmveer Gad (Bahadurgad) history
Sakal
१५ फेब्रुवारी १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कैद करून या गडावर आणले गेले होते; त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ येथे 'शौर्य स्तंभ' उभारण्यात आला आहे.
Dharmveer Gad (Bahadurgad) history
Sakal
"गडावर यादवकालीन कोरीव कामाचा उत्तम नमुना असलेले 'लक्ष्मी-नारायण मंदिर' असून त्याच्या भिंतींवरील नक्षीकाम आणि सुरसुंदरींच्या मूर्ती पाहण्यासारख्या आहेत."
Dharmveer Gad (Bahadurgad) history
Sakal
किल्ल्यात भीमा नदीचे पाणी खापराच्या पाईपमधून खेळवण्यासाठी बांधलेले उंच मनोरे (एअर व्हॉल्व्ह) आणि हत्ती मोट ही शिवकालीन प्रगत पाणीपुरवठा योजनेची साक्ष देतात.
Dharmveer Gad (Bahadurgad) history
Sakal
गडाच्या परिसरात दिवाणे-आम, कलाकुसर केलेला हमामखाना आणि राणी महालाचे अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.
Dharmveer Gad (Bahadurgad) history
Sakal
सिद्धटेकपासून केवळ ९ किमीवर असलेला हा गड पाहण्यासाठी दौंडहून खाजगी वाहनाने सहज जाता येते; इतिहासप्रेमींसाठी हे एक न चुकता पाहण्यासारखे ठिकाण आहे.
Dharmveer Gad (Bahadurgad) history
Sakal
Kohinoor History
Sakal