Aarti Badade
सुमारे ८०० वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध 'गोलकोंडा' खाणीतून कोहिनूर हिरा मिळाला होता, जो भारताच्या श्रीमंतीचे प्रतीक मानला जातो.
Kohinoor History
Sakal
सुरुवातीला कोहिनूरचे वजन १८६ कॅरेट होते; मात्र काळाच्या ओघात अनेकदा पैलू पाडल्यामुळे त्याचे वजन आता कमी झाले आहे.
Kohinoor History
Sakal
आंध्र प्रदेशच्या काकतीय राजांकडे हा हिरा असताना, त्यांनी तो आपल्या कुलदैवत भद्रकाली देवीच्या डोळ्यात बसवला होता.
Kohinoor History
Sakal
चौदाव्या शतकात अलाउद्दीन खिलजीने हा हिरा लुटला, त्यानंतर पानिपतच्या युद्धात तो मुघलांच्या ताब्यात गेला.
Kohinoor History
Sakal
१८४९ मध्ये शीख आणि इंग्रजांमधील दुसऱ्या युद्धानंतर शीखांचे शासन संपले आणि कोहिनूर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला.
Kohinoor History
sakal
१८५० मध्ये हा हिरा लंडनला पोहोचला; तिथे डच फर्म 'कोस्टर'ने याला पुन्हा पैलू पाडले आणि राणीच्या मुकुटात स्थान मिळाले.
Kohinoor History
Sakal
केवळ भारतच नाही, तर पाकिस्तान आणि अफगाणिस्ताननेही कोहिनूरवर आपला मालकी हक्क सांगत ब्रिटनकडे मागणी केली आहे.
Kohinoor History
Sakal
सध्या हा हिरा लंडनच्या 'टॉवर ऑफ लंडन'मध्ये सुरक्षित आहे आणि भारत सरकार तो पुन्हा मायदेशी आणण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.
Kohinoor History
Sakal