Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे.
शिवाजी महाराजांविषयी वाचत असताना इतिहास जिवंत होऊन समोर उभा राहतो.
औरंगजेबाने जिझिया कर लावल्यावर शिवाजी महाराजांनी त्याचा तीव्र निषेध केला.
शिवाजी महाराजांचे पत्र औरंगजेबासाठी जागतिक न्यायाचा धडा होता.
जिझिया करावर शिवाजी महाराजांचे पत्र हिंदू प्रजेसाठी एक प्रेरणादायी दस्तऐवज आहे.
औरंगजेबास वाटले की लढायांमुळे आपला खजिना रिकामा होत आहे.
खजिन्यात भर कोठून घालावी ह्या विवंचनेत त्याने राज्यांतील हिंदू प्रजेवर जिझिया कर बसवून पैसा गोळा करण्याचे ठरवले
मोगल राज्यांतील हिंदू प्रजेवर त्याने जिझिया कर दि. ३-४- १६७९ च्या फर्मानाने बसविला.
हे शिवाजी महाराजांस कळताच त्यांना औरंगजेबाची कीव आली व त्यांनी एक पत्र लिहून औरंगजेब बादशहाची कानउघडणी केली
आपले पारसनीस नीलप्रभू यांजकडून सुंदर फारसी भाषेत एक लांब पत्र बादशहाचे नाव लिहून पाठविले,
ते सुप्रसिद्ध असून वाचनीय आहे. एवढ्या ऐश्वर्यबाज बादशहाचे दोष स्पष्टपणे एकट्या शिवाजी महाराजांनी दाखविले.
शिवराय पत्रात म्हणतात, पातशाही पुरातन हिंदूंची आहे आपल्या अगोदरचे अकबरपासूनचे बादशहा जझियापट्टी घेण्यास समर्थ होते परंतु त्यांनी तसे केले नाही.
न्यायाचे मार्गाने पहाता जझिया पट्टीचा कायदा केवळ गैर आहे.
हिंदू लोकांस पीडा करण्यातच धर्म आहे असे मनामध्ये असल्यास आधी राजा रामसिंह याजपासून जझिया घ्यावा.
गरीब, अनाथ जे मुंग्या चिलटांसारखे आयुष्य जगतात त्यांस उपसर्ग करण्यात काही मोठेपणा नाही
अशा प्रकारे अनेक गोष्टी त्या पत्रात सांगून बादशहाचा हिंदूवर कर बसविल्याबद्दल निषेध केला. (संदर्भ- शिवकाल ग्रंथ)