Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराज अखंड महाराष्ट्रासाठी प्रेरणा स्थान आहेत.
त्यांची यशोगाथा, त्यांचे विचार आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत.
आज आम्ही तुम्हाला महाराजांचे असे 5 विचार सांगणार आहे जे तुम्हाला यश-अपयशात फायद्याचे ठरतील.
"जेव्हा तुम्ही एखादे काम करण्यासाठी उत्साही असता तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगासारखा दिसतो."
"प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे. कारण युद्धादरम्यान, ज्या गोष्टी ताकदीने साध्य करता येत नाहीत त्या ज्ञान आणि युक्त्यांनी साध्य करता येतात आणि ज्ञान शिक्षणातून येते."
"शत्रूला कमकुवत समजू नका, परंतु त्यांच्या ताकदीचा अतिरेकही करू नका."
'कोणतेही काम करण्यापूर्वी, त्याच्या परिणामांचा विचार करणे गरजेचे आहे; कारण आपली भावी पिढी त्याचेच अनुसरण करते.'
'प्रत्येक लहान ध्येयाच्या दिशेने टाकलेले एक छोटे पाऊल मोठे ध्येय साध्य करण्यासाठी महत्वाचे ठरते.'
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला हे 5 विचार फारच मोलाचे ठरणार आहेत.