Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड हा किल्ला १६५६ मध्ये जिंकून घेतला आणि स्वराज्याची राजधानी म्हणून त्याची निवड केली.
शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करून जावळी जिंकली आणि रायरी किल्ल्यावर ताबा मिळवला.
शिवरायांनी रायरी किल्ल्याचे नाव बदलून रायगड ठेवले आणि ते भक्कम बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू केली.
कल्याणचा सुभेदार आबाजी सोनदेव यांना रायगडाच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली. पन्नास हजार होन खर्च करून मोठे बांधकाम करण्यात आले.
१६६२ मध्ये शिवाजी महाराजांनी कायमस्वरूपी राजधानीसाठी रायगडची निवड केली, परंतु प्रत्यक्ष हलविण्यासाठी १६७० पर्यंत वाट पाहावी लागली.
रायगडाच्या सुरक्षिततेसाठी मजबूत तटबंदी उभारण्यात आली आणि पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली.
६ जून १६७४ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक पार पडला आणि स्वराज्याचे अस्तित्व अधिक मजबूत झाले.
शिवरायांच्या निधनानंतर १६८९ पर्यंत रायगड छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात होता. त्यानंतर औरंगजेबाने तो जिंकला.