शिवरायांचे अस्सल चित्र जगासमोर आणणारा मराठी माणूस कोण माहितीये? पाहा फोटो

Saisimran Ghashi

इतिहासाच्या सेवेसाठी समर्पित आयुष्य


पेण येथे जन्मलेले वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळात कामाला सुरुवात करून पूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनासाठी वाहून घेतले.

V.S. Bendre shivaji maharaj photo | esakal

शिवशाहीचा खरा इतिहास मांडण्याची सुरुवात


१९२८ साली ‘साधन चिकित्सा’ हा ग्रंथ प्रकाशित करून बेंद्रेंनी शिवशाही इतिहास संशोधनाच्या नव्या युगाची मुहूर्तमेढ रोवली.

v.s. bendre historian | esakal

शिवरायांचे मूळ आणि प्रमाणिक चित्र


इब्राहिम खानच्या चुकीच्या चित्राऐवजी डच चित्रकाराने रेखाटलेले शिवरायांचे अस्सल चित्र इंग्लंडमधून शोधून पुण्यातील शिवाजी मंदिरात प्रसिद्ध केले.

shivaji maharaj real photo | esakal

संभाजीराजांच्या बदनामीवर संशोधनाच्या आधारे मात


जिथे नाटकांमधून संभाजीराजांची चुकीची प्रतिमा उभी केली जात होती, तिथे ४० वर्षे अथक परिश्रम करून ६५० पानांचा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला.

sambhaji maharaj real photo | esakal

इतिहासासाठी युरोप आणि इंग्लंड दौरा


१९३८ मध्ये मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे बेंद्रे यांना युरोप व इंग्लंडमध्ये ऐतिहासिक साधनसामग्रीचे गाढे संशोधन करता आले.

sambhaji maharaj real history v.s. bendre research | esakal

छत्रपती संभाजीराजांच्या समाधीचा शोध


वढू बुंदरुक येथे असलेली छत्रपती संभाजीराजांची समाधी संशोधनाच्या माध्यमातून प्रथम लोकांसमोर आणली.

V.S. bedre historical research shivaji maharaj era | esakal

संशोधनावर आधारित असंख्य ग्रंथांची निर्मिती


शिवाजी, संभाजी, राजाराम, शहाजी, मालोजी यांचे चरित्र, शिवराज्याभिषेक, संत तुकाराम यांच्या अभंगांचे संकलन असे ६० पेक्षा अधिक ग्रंथ त्यांनी लिहिले.

shivaji maharaj old photos | esakal

महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना


इतिहास संशोधनासाठी व्यासपीठ निर्माण करताना त्यांनी 'महाराष्ट्र इतिहास परिषद' स्थापन केली, ज्यातून आजही अनेक इतिहास संशोधक घडत आहेत.

V S Bendre work | esakal

सामाजिक चळवळींतही अग्रभागी


हुंडाविरोधी चळवळ, ब्रदरहुड स्काऊट संघटना अशा उपक्रमांद्वारे सामाजिक सुधारणा घडवण्यासही त्यांनी हातभार लावला.

shivaji maharaj original photos | esakal

शिवजयंतीची तिथी निश्चित करणारा इतिहासकार


छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी (१९ फेब्रुवारी १६३०) ही फाल्गुन वद्य तृतीया असल्याचे ऐतिहासिक पुराव्यांसह निश्चित करणारे ते पहिले संशोधक ठरले.

shiv jayanti real date revealed by V S Bendre

भारताच्या जुन्यापुराण्या जहाजाने पाकिस्तानी पाणबुडीच्या चिंधड्या उडवल्या, नौदल मिशनची थरारक कहाणी..

PNS Ghazi 1971 war story Indian Navy Bravery | esakal
येथे क्लिक करा