नोकरीवर ठेवताना शिवाजी महाराज माणसातले कोणते गुण बघायचे?

संतोष कानडे

शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज एक प्रशासक म्हणून अत्यंत कठोर होते. माणसं ओळखण्याची हातोटी त्यांच्याकडे होती.

आज्ञापत्र

डॉक्टर केदार फाळके यांनी त्यांच्या आज्ञापत्र या ग्रंथात शिवरायांच्या पत्रव्यवहारांची सखोल मांडणी आणि विश्लेषण केलं आहे.

नोकर

नोकर किंवा चाकर निवडताना कसा निवडावा, याबद्दल शिवरायांचं धोरण लेखकांनी पुराव्यानिशी मांडलं आहे.

सेवक

'नवीन चाकर अथवा सेवकाची सरकारात भरती करताना त्याचे राहण्याचे ठिकाण, भाऊबंद, पहिली चाकरी याबद्दल विचारणा करावी' असं महाराज पत्रामध्ये सांगतात.

बदआमली

'लबाड, परकीयाकडील गुप्तहेर, खुनी, शराबी, बदआमली अशा माणसास सेवेत घेऊ नये' असे आज्ञापत्रात महाराजांनी लिहिले.

शत्रू

परकीयाकडील पाळती सेवेत असू नये, कारण तो, शत्रूस सर्व हकीकत पोहोचवितो, असं महाराज सांगतात.

जामीनदार

एवढंच नाही तर, 'कोणी एक चाकर जामिनाविरहित न ठेवावा, कारण त्याने चोरीमारी केली आणि पळून गेला जामीनदारास जबाबदार धरता येते.'

महाराज

'अशा लोकांची गय न केल्यामुळे राजाचा वचक राहातो, मनुष्य खबरदार होतो व बेलगाम होत नाही' अशा कठोर भाषेत महाराज लिहितात.

सर्जेराव जेधे

हे पत्र पत्र महाराजांनी २७ जून १६६२ रोजी सर्जेराव जेधे यांना लिहिलं होतं. अशी अनेक पत्रं आणि आज्ञापत्रांचा ग्रंथामध्ये अभ्यास केलेला आहे.

एक बिबट्या पकडला की तिथे आणखी तीन बिबटे का येतात?

<strong>येथे क्लिक करा</strong>