Pranali Kodre
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ३२ मण सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं होतं.
महाराजांच्या निधनानंतर त्या सिंहासनाचे पुढे काय झाले याविषयी अनेकांना उत्सुकता असते.
शिवरायांच्या अकाली मृत्यूनंतर काही काळासाठी अल्पवयीन राजाराम महाराज गादीवर बसले पण रायगडावरचे बंड मोडून संभाजी महाराज छत्रपती बनले.
१६८९ साली छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने फितुरीने पकडले तेव्हा राजाराम महाराजांना पुन्हा गादीवर बसवण्यात आले.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात अनागोंदी माजली. स्वतः औरंगजेब पुण्याजवळ कोरेगाव येथे ठाण मांडून बसला होता.
राजाराम महाराज छत्रपती बनले तरी रायगडावरचा कारभार संभाजी महाराजांच्या पत्नी राणी येसुबाई या सांभाळत होत्या.
औरंगजेबाने आपला विश्वासू व पराक्रमी सरदार झुल्फिकार खान याला रायगड जिंकण्याची जबाबदारी दिली.
मार्च १६८९ रोजी खानाने रायगडाला वेढा मारला. ५ एप्रिल रोजी छत्रपती राजाराम महाराज आपल्या कुटुंबासह रायगडावरून निसटले.
रायगडावर राणी येसुबाई संभाजी महाराजांचे पुत्र शाहू व शिवरायांच्या पत्नी सकवारबाई असे अनेक लोक मागे राहिले.
सूर्याजी पिसाळ याच्या गद्दारीमुळे नोव्हेंबर १६८९ रोजी रायगडाचा ताबा मुघलांना मिळाला. राणी येसुबाई यांनी तहावर सही केली.
राजधानी रायगड हातात आल्यावर झुल्फीकार खानाने शिवरायांचे दफ्तर जाळून टाकले आणि सिंहासन फोडले. किल्ल्याच्या बंदोबस्ताला अधिकारी नेमण्यात आले.
राणी येसुबाई व युवराज शाहू यांना कैदेत टाकण्यात आले. रायगडाचे नाव झुल्फीकार खानाने उत्तमगड इस्लाम असे ठेवले.