सकाळ डिजिटल टीम
आजकाल लग्न, उत्सव किंवा कॉलेजच्या ट्रेडिशनल डे मध्ये कोल्हापुरी चप्पल घालण्याचा ट्रेंड आहे. पांढरा शर्ट, डोक्यावर फेटा आणि कर-कर आवाज करणारी कोल्हापुरी चप्पल!
तरुणांमध्ये या चप्पलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मुलींचाही यामध्ये सहभाग कमी नाही.
कोल्हापूरची रांगडी भाषा, खाद्यसंस्कृती, लोककला आणि कोल्हापुरी चप्पल यांचे जगभरात मानाचे स्थान आहे.
१३व्या शतकात निर्मिती झाली. पूर्वीच्या ती फक्त राजे महाराजे यांच्या पायात दिसायची. छत्रपती देखील पादत्राण म्हणून कोल्हापुरी वापरायचे
राजर्षी शाहू महाराजांच्या काळात चामड्याच्या वस्तूंचा वापर होत असे आणि त्यांची चप्पल बनवण्यासाठी कुशल चर्मकार हे कारागिर होते.
पांडुरंग पाखरे नावाच्या व्यक्तीने या चपलेला कोल्हापुरातून मुंबईत आणले आणि मुंबईकरांना या चपलेची ओळख करून दिली
शाहू महाराजांच्या काळात १९२० साली कोल्हापूरातील सौदागर परिवाराने या चपलेला आकर्षक असं रूप दिलं आणि वजनही कमी केलं.
या नवीन चपला दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध जे जे अँड सन्स या चप्पल दुकानात विक्रीसाठी आल्या आणि कोल्हापुरी सर्वसामान्यांमध्ये फेमस झाली.
कोल्हापुरी चप्पलांची अनेक नावे आहेत - कापशी, पुडा मोरकी, गांधीवादी आणि इतर. या चप्पला आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत.
कोल्हापुरी चप्पलांची प्रदर्शने विदेशातही भरवली जातात. त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणि महत्त्व जगभर पसरले आहे.