Payal Naik
आज १४ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित 'छावा' चित्रपट प्रदर्शित झालाय.
या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.
आज अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ठिकठिकाणी थिएटर्स हाऊसफुल आहेत.
या चित्रपटातील स्टार कास्ट आता समोर आलीये. मात्र चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कुणी केलीये हे अजूनही गुलदस्त्यात होतं.
चित्रपटात महाराजांची भूमिका कोण साकारतंय हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता अखेर हे कोडं उलगडलं आहे.
विकी कौशलच्या 'छावा'मध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. छावा सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व तर आहे. पण, ते सिनेमात मात्र दिसत नाहीत.
कोणत्याही अभिनेत्याने किंवा व्यक्ती सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली नाही.
सिनेमात शिवाजी महाराजांचा फक्त आवाज ऐकू येतो. हा आवाज लक्ष्मण उतेकर यांनीच दिला आहे.
ते शंभूराजेंसोबत संवाद साधताना दाखवण्यात आलं आहे. पेचात सापडलेल्या शंभू महाराजांना रस्ता दाखवण्यासाठी वेळोवेळी शिवाजी महाराज येतात असं दाखवण्यात आलं आहे.
त्यामुळे महाराजांची भूमिका कुणीही साकारली नसली तरी त्यांच अस्तित्व कायम शंभू राजांसोबत दाखवण्यात आलंय.
पुणे मुंबई नाही तर महाराष्ट्रातल्या 'या' गावात सुरू आहे 'पारू' मालिकेचं शूटिंग