चिया सीड्स खाण्याचा धोका देखील आहे! या लोकांनी आवर्जून टाळा

Anushka Tapshalkar

लो ब्लड प्रेशर असलेल्यांनी

चिया सीड्समध्ये पोटॅशियम जास्त असतं. त्यामुळे लो बीपी असलेल्या लोकांमध्ये रक्तदाब आणखी कमी होऊन चक्कर येणे, थकवा जाणवू शकतो.

low blood pressure |

sakal

पचनाच्या समस्या असलेल्यांनी

चिया सीड्समधील फायबर जास्त असल्याने अल्सर, गॅस किंवा पोटदुखी असलेल्या लोकांना त्रास वाढू शकतो.

indigestion

|

sakal

रक्त पातळ करणारी औषधं घेणाऱ्यांनी

चिया बियामध्ये ओमेगा-३ असतो. हे रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत (उदा. aspirin) घेतल्यास रक्तस्त्रावाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

if taking Aspirins

|

sakal

किडनीच्या रुग्णांनी दूर राहा

चिया बियामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो.

kidney problems

|

sakal

'सुपरफूड' सगळ्यांसाठीच चांगलं नाही!

प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. चिया बिया पौष्टिक असल्या तरी काही लोकांसाठी त्या अपायकारक ठरू शकतात.

Superfood not for everyone

|

sakal

डॉक्टरांचा सल्ला घ्या

जर तुम्ही औषधे घेत असाल किंवा तुम्हाला आधीपासूनच काही आरोग्य समस्या असतील, तर चिया बियांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Doctor's Advice | sakal

किती प्रमाणात घ्यावं?

डाएटिशियन सुपर्णा मुखर्जी यांच्या म्हणण्यानुसार, प्रौढ व्यक्तीने दररोज १ ते २ टेबलस्पून (१५–३० ग्रॅम) चिया बियांचे सेवन करणे सुरक्षित आहे.

घरात कायम असणारे हे पदार्थ टाळू शकतात कॅन्सरचा धोका

Indian kitchen foods that may prevent cancer

|

sakal

आणखी वाचा