घरात कायम असणारे हे पदार्थ टाळू शकतात कॅन्सरचा धोका

Anushka Tapshalkar

हळद

हळदीत असलेले कर्क्युमिन हे संयुग शरीरातील सूज कमी करते आणि कॅन्सरच्या पेशींना वाढू देत नाही. दररोजच्या आहारात हळद घातल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Turmeric Drink Benefits | Sakal

टोमॅटो

टोमॅटोमधील लायकोपीन हे अँटिऑक्सिडंट प्रोस्टेट आणि पोटाच्या कॅन्सरपासून संरक्षण करते. शिजवलेले टोमॅटो शरीरात अधिक सहजपणे शोषले जातात.

tomato

| sakal

तुळस

तुळशीतील युजेनॉल हे घटक स्तनाच्या कॅन्सरविरोधात मदत करते. तुळस चहा, सूप किंवा जेवणात वापरल्यास प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरातील सूज कमी होते.

tulsi | sakal

आवळा

आवळ्यात विपुल प्रमाणात व्हिटॅमिन C आणि फायटोफिनॉल्स असतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात. नियमित सेवन केल्याने फुफ्फुस आणि स्तन कॅन्सरचा धोका कमी होतो.

पालक व हिरव्या पालेभाज्या

पालकातील फोलेट आणि फायबर डीएनएची दुरुस्ती करतात आणि पोट व मोठ्या आतड्याच्या कॅन्सरपासून संरक्षण करतात.

डॉ. सुदीप्तो डे यांचा सल्ला

कॅन्सरपासून संरक्षणासाठी महागडी पूरक आहाराची आवश्यकता नाही. आपल्या स्वयंपाकघरातच उपचार लपलेले आहेत, असे डॉ. डे म्हणतात.

Doctor's Advice | sakal

रोजच्या आहारातूनच संरक्षण

हळद, तुळस, आवळा, पालक आणि टोमॅटो या घटकांचा आहारात समावेश केल्याने आपण कॅन्सरचा धोका कमी करू शकतो. आरोग्याची सुरुवात आपल्या आहारातूनच होते!

Daily Diet

| sakal

ग्लोइंग स्किनसाठी प्राजक्ता कोळी घरीच बनवते DIY फेसस्क्रब

Prajkta Koli's Natural Face Scrub

|

sakal

आणखी वाचा