Aarti Badade
वजन कमी करताना आहारात कोणती बिया घ्यावीत, हा नेहमीचा प्रश्न. चला जाणून घेऊया चिया बिया आणि जवस बियाण्यांचे फायदे.
पोषणतज्ञांच्या मते, बियांमध्ये असलेले पोषक घटक वजन कमी करण्यास आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.
चिया बिया साल्व्हिया हिस्पॅनिका वनस्पतीपासून मिळतात. या छोट्या बियांमध्ये फायबर, प्रथिने आणि ओमेगा-३ भरपूर असते.
अळशी (जवस) बियांमध्ये फायबर, निरोगी चरबी आणि लिग्निन नावाचे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते.
२ चमचे चिया बिया = १३८ कॅलरीज, १० ग्रॅम फायबर, ४ ग्रॅम प्रथिने.
२ चमचे जवस = १२० कॅलरीज, ७ ग्रॅम फायबर, ३ ग्रॅम प्रथिने.
चिया बिया पाणी शोषून जेलसारखे बनतात, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि भूक कमी होते.
जवस बिया पचन सुधारतात, बद्धकोष्ठता कमी करतात, हार्मोन्स संतुलित करतात आणि दीर्घकाळ ऊर्जा देतात.
चिया बिया भूक नियंत्रित करण्यासाठी चांगल्या, तर जवस बिया हार्मोन्स संतुलन आणि अँटीऑक्सिडंट्ससाठी उपयुक्त.
वजन कमी करण्यासाठी दोन्ही बियांना आहारात योग्य प्रमाणात समाविष्ट करा आणि त्यांचे फायदे मिळवा.