Aarti Badade
योग्य आहाराने केस गळती थांबवा आणि वाढ वेगवान करा लांब, निरोगी केस.
प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला केस गळतीची समस्या भेडसावते. चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे केसांची वाढ थांबते. योग्य सुपरफूड्सचा समावेश केसांना नवजीवन देतो.
व्हिटॅमिन सी ने समृद्ध आवळा केसांची मुळे मजबूत करतो आणि टाळूमधील रक्ताभिसरण सुधारून वाढीस चालना देतो.
काळ्या तीळांमधील लोह आणि कॅल्शियम केसांना पोषण देतात, केस गळणे कमी करतात आणि त्यांना जाडसर बनवतात.
ओमेगा-३ फॅटी अॅसिडने भरपूर चिया बिया केसांना चमक, मऊपणा आणि जलद वाढ देतात.
काळे हरभरे प्रथिने व जस्त देतात, जे केस गळती कमी करून नवीन केस उगवण्यास मदत करतात. ताजे नारळ निरोगी चरबी व खनिजांनी केसांना खोलवर पोषण देतो व कोरडेपणा कमी करतो.
लोह व व्हिटॅमिन ए समृद्ध पालक केसांचे आरोग्य सुधारतो आणि नैसर्गिकरित्या केसांची वाढ वेगवान करतो.
दह्यातील प्रथिने व प्रोबायोटिक्स टाळूचे आरोग्य सुधारतात. दही खाल्ल्याने तसेच केसांना लावल्याने केस मऊ व रेशमी होतात.