एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! असा बनवा झटपट सुपरटेस्टी चिकन पराठा!

Aarti Badade

नाश्त्यासाठी पौष्टिक पर्याय

सकाळच्या नाश्त्यासाठी चिकन पराठा हा एक भन्नाट आणि दिवसभर ऊर्जा देणारा प्रोटीनयुक्त पर्याय आहे.

Chicken Paratha recipe

|

Sakal

चिकन पराठ्यासाठी साहित्य

१ कप शिजवलेले चिकन कुस्करलेले, २ कप गव्हाचे पीठ, कांदा, आले-लसूण पेस्ट, मसाले आणि साजूक तूप.

Chicken Paratha recipe

|

Sakal

चविष्ट स्टफिंग तयार करा

कढईत तेल गरम करून कांदा, आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची सोनेरी रंगावर परतून घ्या.

Chicken Paratha recipe

|

sakal

मसाल्यांची फोडणी

कुस्करलेल्या चिकनमध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, मटण मसाला, आणि चवीनुसार मीठ घालून २-३ मिनिटे चांगले परता. शक्यतो पाणी टाकू नका.

Chicken Paratha recipe

|

sakal

मऊ कणीक मळून घ्या

गव्हाच्या पिठात थोडे मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पराठ्यासाठी मऊ कणीक मळून तयार ठेवा.

Chicken Paratha recipe

|

Sakal

पराठ्यात स्टफिंग भरा

कणकेच्या मध्यम गोळ्यामध्ये तयार केलेले चिकन स्टफिंग भरून हलक्या हाताने गोलाकार पराठा लाटून घ्या.

Chicken Paratha recipe

|

Sakal

तुपावर खमंग भाजा

गरम तव्यावर साजूक तूप किंवा तेल लावून पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजा.

Chicken Paratha recipe

|

Sakal

चटणीसोबत आस्वाद घ्या

हा गरमागरम आणि लज्जतदार चिकन पराठा दही, लोणचे किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Chicken Paratha recipe

|

Sakal

कांदाभजीला द्या सुट्टी! घरीच बनवा हॉटेलसारखी कुरकुरीत कोळंबी भजी

Prawns kolambi Bhaji recipe

|

Sakal

येथे क्लिक करा