कांदाभजीला द्या सुट्टी! घरीच बनवा हॉटेलसारखी कुरकुरीत कोळंबी भजी

Aarti Badade

युनिक पदार्थ!

थंडीच्या दिवसांत चमचमीत खाण्याची इच्छा झाली की भजी बनवतो. पण यावेळी मासेप्रेमी असाल तर अशी झटपट आणि टेस्टी कोळंबी भजी ट्राय करा.

Prawns kolambi Bhaji recipe

|

sakal

कोळंबी साफ करताना

कोळंबी बनवण्यापूर्वी ती स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. कोळंबीच्या पाठीवरील तो काळा धागा आवर्जून काढून टाका, अन्यथा पोटाचे विकार होऊ शकतात. त्यानंतर कोळंबी स्वच्छ धुवून घ्या.

Prawns kolambi Bhaji recipe

|

Sakal

कुबट वास घालवण्यासाठी टिप्स

कोळंबीचा कुबट वास घालवण्यासाठी तिला थोडा वेळ मीठ आणि कोकम आगळ किंवा लिंबाचा रस लावून ठेवा. यामुळे कोळंबीला छान चव येते आणि वासही निघून जातो."

Prawns kolambi Bhaji recipe

|

Sakal

लागणारे साहित्य

कोळंबी (स्वच्छ केलेली),आलं-लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर,लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे-जिरे पूड,बेसन, तांदळाचे पीठ आणि एक अंडे

Prawns kolambi Bhaji recipe

|

Sakal

मॅरिनेशनची पहिली पायरी

एका ताटात स्वच्छ कोळंबी घेऊन त्यात बारीक चिरलेला कढीपत्ता, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला आणि धणे-जिरे पूड घालून व्यवस्थित मिक्स करा.

Prawns kolambi Bhaji recipe

|

Sakal

कुरकुरीतपणासाठी 'हे' मिसळा

आलं-लसूण पेस्ट, कोकम आगळ, एक अंडे, तांदळाचे पीठ आणि बेसन घाला. कोळंबी भजी बनवताना त्यात पाणी अजिबात घालू नका, कोळंबीच्या ओलाव्यातच पीठ मिक्स करा.

Prawns kolambi Bhaji recipe

|

Sakal

गरमागरम तळून घ्या!

कढईत तेल कडकडीत गरम करा. आता पिठात घोळलेली कोळंबी एक-एक करून तेलात सोडा आणि मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Prawns kolambi Bhaji recipe

|

Sakal

सर्व्ह करा आणि आस्वाद घ्या!

तयार आहेत तुमची गरमागरम आणि कुरकुरीत कोळंबी भजी! ही भजी तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता. या सुट्टीत ही रेसिपी नक्की ट्राय करा!

Prawns kolambi Bhaji recipe

|

Sakal

कोळंबी आवडणाऱ्यांसाठी... फक्त 10 मिनिटांत तयार करा चटपटीत तवा प्रॉन्स मसाला

Tawa Prawns Masala Seafood Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा