अमेरिकेत चिकनचा दर किती?

Aarti Badade

अमेरिकेत चिकनचे दर किती आहेत?

अमेरिकेत चिकनच्या प्रकारानुसार साधारण १.७५ ते ४.१० डॉलर प्रति पाउंड दराने चिकन मिळते, म्हणजेच भारतीय चलनानुसार प्रति किलो सुमारे ३६० ते ८४० रुपये खर्च येऊ शकतो.

Chicken Price in USA

|

Sakal

अमेरिकेत वजन पाउंडमध्ये मोजतात!

भारतात चिकनची खरेदी किलोमध्ये केली जाते, तर अमेरिकेत वजन मोजण्यासाठी पाउंड हे परिमाण वापरले जाते आणि एक पाउंड म्हणजे सुमारे ४५३ ग्रॅम असते.

Chicken Price in USA

|

Sakal

चिकन लेग्स सर्वात स्वस्त!

अमेरिकेत हाडांसह चिकन लेग्सची सरासरी किंमत १.७५ डॉलर प्रति पाउंड असून, भारतीय रुपयांमध्ये त्याचा दर साधारण ३६० रुपये प्रति किलो होतो.

Chicken Price in USA

|

Sakal

अख्ख्या चिकनसाठी किती पैसे मोजावे लागतात?

अख्ख्या चिकनची किंमत साधारण २.०३ डॉलर प्रति पाउंड असून, भारतीय चलनानुसार प्रति किलो सुमारे ४१५ रुपये मोजावे लागतात.

Chicken Price in USA

|

Sakal

बोनलेस चिकन ब्रेस्ट सर्वात महाग!

बोनलेस चिकन ब्रेस्टची किंमत साधारण ४.१० डॉलर प्रति पाउंड असून, त्याचा प्रति किलो दर भारतीय रुपयांत जवळपास ८४० रुपये होतो.

Chicken Price in USA

|

Sakal

ऑरगॅनिक चिकनच्या किमती जास्त!

सामान्य चिकनच्या तुलनेत अँटीबायोटिक-फ्री आणि ऑरगॅनिक चिकन महाग असते, तर काही सुपरमार्केटमध्ये मोठ्या पॅकमधील चिकन तुलनेने कमी दरातही मिळू शकते.

Chicken Price in USA

|

Sakal

शहर आणि स्टोअरनुसार बदलतात दर!

न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियासारख्या महागड्या शहरांमध्ये तसेच भारतीय किंवा हलाल स्टोअर्समध्ये चिकनचे दर अधिक असू शकतात, त्यामुळे खरेदीपूर्वी वेगवेगळ्या स्टोअर्समधील किमती तपासणे फायदेशीर ठरते.

Chicken Price in USA

|

Sakal

पुण्यातील 'खुन्या मुरलीधर' मंदिराचं नाव असं का पडलं? दडलीये रक्तरंजित कहाणी!

Khunya Murlidhar Temple

|

Sakal

येथे क्लिक करा