Monika Shinde
हिवाळ्यात गरम सूप शरीराला उष्णता देते, प्रतिकारशक्ती वाढवते आणि पचन सुधारते. नॉनवेजमध्ये चिकन सूप आणि मटण पाया सूप सर्वाधिक लोकप्रिय आणि पोषणदायी मानले जातात.
चिकन सूप प्रोटीन, व्हिटामिन B6, B12, सेलेनियम आणि फॉस्फोरसने समृद्ध असते. हे मसल्स मजबूत करते, ऊर्जा वाढवते आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण देण्यास मदत करते.
पाया सूपमध्ये प्रोटीन, आयर्न, झिंक, कोलाजेन, कॅल्शियम आणि अमिनो अॅसिड मुबलक असतात. ते हाडे बळकट करणे, शक्ती वाढवणे आणि शरीराला उब देण्यास उत्तम आहे.
लांब वेळ शिजवलेल्या पाया ब्रॉथमधील कोलाजेन व अमिनो अॅसिड सांधे मजबूत करतात, सूज कमी करतात आणि हाडांच्या पुनर्बांधणीस मदत करतात. हिवाळ्यात शरीरासाठी विशेष लाभदायक.
प्रोटीनची अधिक गरज असलेल्या, वजन कमी करणाऱ्या किंवा रोज हलके, पचायला सोपे सूप घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी चिकन सूप योग्य. हे रोजच्या आहारात सुरक्षितपणे समाविष्ट करता येते.
फ्रॅक्चर, सांधेदुखी, कमजोरी, हाडांच्या तक्रारी असणाऱ्यांसाठी पाया सूप उपयुक्त. मुलांच्या वाढीसाठीही चांगले. मात्र यात फॅट जास्त असल्याने रोज सेवन टाळावे.
चिकन आणि पाया दोन्ही सूप प्रतिकारशक्ती वाढवतात. चिकन सूप सर्दी-जुकाम कमी करते, तर पाया सूप सूज व थकवा कमी करून शरीराला खोलवर पोषण देते.
डायटिशियननुसार, रोजच्या आहारासाठी चिकन सूप उत्तम. पाया सूप पोषणदायी पण जास्त फॅट असल्याने आठवड्यातून एकदा योग्य. आपल्या शरीराच्या गरजेनुसार निवड करा.