Monika Shinde
प्रोटीन पावडर खरंच आवश्यक असतं का? चला तर जाणून घेऊयात
Protein is Important for Fitness Goals
esakal
अनेकांना आहारातूनच पुरेसं प्रोटीन मिळतं, पण व्यायामाची तीव्रता वाढली की शरीराला अतिरिक्त पोषणाची गरज निर्माण होते आणि सप्लिमेंट्स उपयुक्त ठरू शकतात.
Protein is Important for Fitness Goals
esakal
बहुतांश लोक दैनंदिन अन्नातून प्रोटीन घेतात; दूध, अंडी, डाळी, कडधान्ये आणि मांस यांसारखे पदार्थ शरीराला शक्ती देतात. संतुलित आहार असेल तर प्रोटीन पावडरची गरज कमी भासते.
Protein is Important for Fitness Goals
esakal
जोरदार व्यायाम करणाऱ्यांना स्नायूंच्या पुनर्बांधणीसाठी जास्त प्रोटीन लागते. अशावेळी प्रोटीन पावडर सोपा, झटपट आणि विश्वासार्ह पर्याय ठरतो.
Protein is Important for Fitness Goals
esakal
वजन वाढवायचं किंवा कमी करायचं असल्यास योग्य प्रमाणात प्रोटीन घेणं महत्त्वाचं ठरतं. पोट न भरता पोषण मिळवण्यासाठी प्रोटीन पावडर मदत करतो. त्यामुळे फिटनेस प्रवास अधिक सोपा होतो.
Protein is Important for Fitness Goals
esakal
निकृष्ट दर्जाचा प्रोटीन पावडर घेतल्यास पचनाच्या समस्या, फुगणे, ऍलर्जी किंवा मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. म्हणून ब्रँड, घटक आणि गुणवत्ता तपासूनच सप्लिमेंट निवडणे नेहमीच फायदेशीर ठरते. आरोग्यासाठी ही काळजी महत्त्वाची असते.
Protein is Important for Fitness Goals
esakal
फक्त व्यायाम नसेल तरी काही लोकांना आहारातील प्रोटीन कमी पडू शकतं. कामाचा ताण, अनियमित जेवण किंवा शाकाहारी आहारामुळे गरज वाढते. अशावेळी पूरक प्रोटीन उपयुक्त ठरतं.
Protein is Important for Fitness Goals
esakal
प्रोटीन पावडरचा प्रकार निवडताना व्हे, केसिन, प्लांट-बेस्ड किंवा आयसोलेट यांचे फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्रकाराचे फायदे वेगळे असल्याने गरजेनुसार पर्याय बदलतो.
Protein is Important for Fitness Goals
esakal