Shubham Banubakode
चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचं ठिकाण. हिरवीगार टेकड्या आणि धुक्याने भरलेले दऱ्यांचं विहंगम दृश्य इथे बघायला मिळलं.
याच चिखलदऱ्याला विदर्भाचं काश्मीर म्हणूनही ओळखलं जातं. याठिकाणी दरवर्षी हजारो पर्यंटक भेट देतात.
इथे फिरण्यासाठी भीमकुंड, पंचबोल पॉइंट, गावीलगड किल्ला, हरिकेन पॉइंट आणि बोटॅनिकल गार्डन अशी अनेक ठिकाणं आहेत.
महाभारतात किचक राक्षसाचा वध करून भीमाने याच कुंडात आंघोळ केली होती. त्यामुळे त्याला भीमकुंड असं नाव पडलं.
१२व्या शतकातील हा प्राचीन किल्ला म्हणजे वास्तुकला, इतिहास आणि ट्रेकिंगप्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे.
चिखलदऱ्यातील भीमकुंड आणि पंचबोल पॉईंटवरील धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. पावसाळ्यात हे धबधबे पूर्ण भरतात.
सातपुड्यातील दऱ्या, जंगलं आणि थंड हवेचं हे ठिकाण म्हणजे शांतता अनुभवन्याचं उत्तम ठिकाण आहे.
चिखलदरा हे राज्यातील एकमेव ठिकाण आहे, जिथे कॉफी शेती होते. इथे नैसर्गिक कॉफीचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.
हे ठिकाण म्हणजे फोटोग्राफर्ससाठी स्वर्गच! इथे सुर्योदय आणि सुर्यास्त असं दोन्ही बघू शकतात.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात असलेल्या हे ठिकाण म्हणजे ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे. वन्यजीव निरीक्षणासाठीही अनेक जण इथे भेट देतात.
साहसी खेळांसाठीही तुम्ही चिखलदऱ्याला भेट देऊ शकता.इथे रोप सायकलींग सारखे अनेक साहसी खेळ अनुभवू शकता.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेऊ शकतात. याठिकाणी वाघ, बिबटे, अस्वल असे अनेक प्राणी दिसू शकतात.
भारतातल्या पहिला स्कायवॉकची निर्मिती चिखलदऱ्यात होते आहे. या स्कॉयवॉचं बरंच काम पूर्ण झालं आहे.
डिसेंबर ते सप्टेंबर दरम्यान चिखलदऱ्याचं हवामान पर्यंटनासाठी अनुकूल असतं. विशेषत पावसाळ्यात याचं आणखी सौंदर्य खुलून दिसतं.