Shubham Banubakode
वेरूळ जे, ऐतिहासिक लेण्यांसाठी ओळखले जाते, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ गाव आहे. येथे शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अवशेष आजही पाहायला मिळतात.
वेरूळ हे शहाजीराजे भोसले यांचे जन्मगाव आहे. त्यांचे वडील मालोजीराजे यांचे येथील गढी हे निवासस्थान होते, ज्याचे अवशेष आजही ऐतिहासिक वारसा जपतात.
दरवर्षी 18 मार्च रोजी वेरूळ येथे शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.
23 जानेवारी 1664 रोजी बंगळूरजवळील होदेगिरीच्या जंगलात शिकारीदरम्यान शहाजीराजे घोड्यावरून पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा उल्लेख इतिहासात आढळतो.
वेरूळ येथे शहाजीराजे यांचे स्मारक गढीच्या परिसरात उभारण्यात आले आहे. येथील मातीच्या 1 ते 1.5 मीटर जाडीच्या आणि 4 ते 5 मीटर उंचीच्या भिंती आणि बुरूज आजही उभे आहेत.
2004 ते 2006 दरम्यान राज्य पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात मूदपाकखाना, खोल्यांचे जोते, धान्य कोठार, लाल दगडातील गणपती मूर्ती, चांदीची अंगठी, तांब्याची नाणी, मातीचे दिवे, दागिने आणि बांगड्या सापडल्या.
मालोजीराजे भोसले यांनी वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आणि शिखर शिंगणापूर येथील तलावाची निर्मिती केली. त्यांचे धार्मिक आणि जनहितार्थ कार्य इतिहासात नोंदले आहे.
शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे वेरूळची पाटीलकी आणि आसपासच्या गावांची जहागिरी होती. निजामशाहीच्या काळात त्यांनी हा मुलुख सांभाळला.
शहाजीराजे यांनी वेरूळ येथून निजामशाहीच्या कारभारात भाग घेतला. मोगलांशी लढाईचे नियोजनही येथूनच झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मालोजीराजेंच्या जहागिरीचा कारभार सांभाळला गेला.