संतोष कानडे
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले 'चिखलदरा' हे थंड हवेचे ठिकाण कॉफीच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात कॉफीचे उत्पादन घेतले जाणारे चिखलदरा हे एकमेव हिल स्टेशन आहे.
ब्रिटिश अधिकारी कॅप्टन रॉबिन्सन यांनी १८२३ मध्ये या ठिकाणाचा शोध लावून येथे कॉफीची लागवड सुरू केली होती.
येथे उच्च दर्जाची अरेबिका कॉफी पिकवली जाते आणि हिवाळ्यात येथील सकाळच्या हवेत कॉफीचा सुगंध दरवळत असतो.
विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे हे शहर समुद्रसपाटीपासून सुमारे १,११८ मीटर उंचीवर आहे.
हिवाळ्याच्या दिवसांत येथील दऱ्यांमध्ये दाट धुके आणि आल्हाददायक गारठा पाहायला मिळतो.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत असल्यामुळे येथे घनदाट जंगल आणि वन्यजीवांचे दर्शनही घडते.
कॉफीच्या बागांव्यतिरिक्त येथे ऐतिहासिक गाविलगड किल्ला आणि महाभारतकालीन भीमकुंड ही प्रमुख आकर्षणे आहेत.
हरिकेन पॉईंट, पंचबोल पॉईंट आणि देवी पॉईंटवरून सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते.
दक्षिण भारतातील हिल स्टेशनसारखा अनुभव घेण्यासाठी हिवाळ्यात चिखलदऱ्याची सफर हा एक उत्तम पर्याय आहे.