संतोष कानडे
जगात एक असा प्राणी आहे, जो आयुष्यभर थेट पाणी न पिता जगू शकतो. या प्राण्याचे नाव आहे कांगारू उंदीर
हा प्राणी प्रामुख्याने उत्तर अमेरिकेतील रखरखीत वाळवंटी प्रदेशात आढळतो.
दिसायला उंदरासारखा असणाऱ्या या प्राण्याचे मागचे पाय लांब असतात आणि शेपटीही शरीरापेक्षा मोठी असते.
कांगारू उंदीर प्रामुख्याने बिया, धान्य आणि वनस्पतींचे भाग खातो.
विशेष म्हणजे, तो अन्नातील घटकांचे विघटन करताना शरीरात तयार होणाऱ्या पाण्यावर आपली तहान भागवतो. या पाण्याला चयापचयजन्य पाणी म्हणतात.
त्याच्या शरीरातील मूत्रपिंडे अत्यंत कार्यक्षम असतात. त्यामुळे तो लघवीतून पाण्याचा अपव्यय खूप कमी करतो.
त्याची विष्ठाही अत्यंत कोरडी असते. त्यामुळे शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यास मदत होते.
वाळवंटी वातावरणात पाणी सहज उपलब्ध नसतानाही या वैशिष्ट्यांमुळे तो तग धरू शकतो.
कांगारू उंदीर दिवसा बिळात राहतो आणि प्रामुख्याने रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतो.
निसर्गाने या छोट्याशा प्राण्याला पाण्याची बचत करण्याची अशी अद्भुत क्षमता दिली आहे की, तो थेट पाणी न पिता संपूर्ण आयुष्य जगू शकतो.