Pranali Kodre
पावसाळ्यात डास खूप वाढतात. यामुळे काही गंभीर आजार होऊ शकतात. चिकुनगुनिया, डेंग्यू आणि मलेरिया हे त्यापैकी मुख्य आजार आहेत.
ताप आल्यावर सुरुवातीला अंगदुखी, डोकेदुखी, कधीकधी उलटी आणि अशक्तपणा जाणवतो. पण प्रत्येक आजाराची विशिष्ट लक्षणं वेगळी असतात.
चिकुनगुनियामध्ये तापासोबत हात-पायांचे लहान सांधे खूप दुखतात. पाठीतही तीव्र वेदना होतात. मोठे सांधे सहसा दुखत नाहीत.
या आजारात सांधे आखडतात. हालचाल करणे कठीण होते. त्यामुळे चालणे, उठणे, बसणे यावर परिणाम होतो.
डेंग्यूमध्ये डोळ्यांच्या मागे दुखते, हाडे व स्नायू दुखतात. शरीरावर लालसर पुरळ येतात. काहीवेळा तोंडात किंवा त्वचेवर रक्तस्त्रावाचे ठिपके दिसतात.
हात, पाय, चेहरा आणि संपूर्ण शरीर लालसर दिसू लागते. याला 'डेंग्यू रॅश' असेही म्हणतात.
मलेरियामध्ये ताप येण्याआधी खूप थंडी वाजते. ताप काही तासांत कमी होतो, पण तो परत परत येतो.
उलटी, अशक्तपणा, डोकेदुखी, आणि कधीकधी पचनाच्या तक्रारी दिसतात. पण पुरळ किंवा सांधेदुखी सहसा नसते.
चिकुनगुनियामध्ये सांधे दुखतात, डेंग्यूमध्ये रक्तस्त्राव/पुरळ दिसतो, तर मलेरियात थंडी वाजून ताप येतो; कोणत्याही लक्षणांवर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डासांपासून वाचण्यासाठी डास प्रतिबंधक वापरा, पाणी साचू देऊ नका, पूर्ण कपडे घाला आणि आजारी पडल्यास वेळेवर उपचार घ्या.