Pranali Kodre
आपण अनेकदा पिण्याच्या पाण्याची बॉटल विकत घेतो, पण त्याच्या झाकणाचा वेगवेगळा रंग आपण पाहिला असेल. या रंगामागे काही कारणं असतात.
भारतात १९७० मध्ये पहिल्यांदा बाटलीबंद पाणी बाजारात आलं होतं.दरम्यान, अनेक रिपोर्ट्सनुसार भारतात बॉटलच्या झाकणाच्या रंगावरून पाण्याचा प्रकार लक्षात येतो.
पाण्याच्या बॉटलचं झाकण निळ्या रंगाचं असेल, तर ते स्प्रिंग वॉटरपासून तयार केलेलं मिनरल वॉटर असतं – नैसर्गिक आणि फिल्टर्ड.
जर पाण्याच्या बॉटलला हिरव्या रंगाचं झाकण असेल, तर ते पाणी स्वादयुक्त (फ्लेवर्ड) असतं. त्यात कृत्रिम किंवा नैसर्गिक फ्लेवर्स मिसळलेले असतात.
पाण्याच्या बॉटलच्या पांढऱ्या झाकणाचा अर्थ असा की हे पाणी मशीनद्वारे शुद्ध केलेलं आहे.
काळं झाकण असलेल्या बॉटलमधील पाणी अल्कलाइन असतं. हे पाणी शरीरासाठी अधिक फायदेशीर असून इतर पाण्याच्या बाटल्यांपेक्षा महाग असतं.
जर झाकण पिवळ्या रंगाचं असेल, तर त्यातील पाण्यात अतिरिक्त विटॅमिन्स आणि इलेक्ट्रोलाईट्स मिसळलेले असतात – खासकरून खेळाडूंसाठी उपयुक्त असते.
आता पुढच्या वेळी बॉटल विकट घेताना त्याच्या झाकणाचा रंग आणि त्यामागील अर्थ लक्षात ठेवा.