Monika Shinde
पावसात अनेक विषाणू आणि जंतूंनी पाणी दूषित होतं. त्यामुळे मुलांना नेहमी फिल्टर केलेले किंवा उकळलेले पाणीच पाजावं. घराबाहेर जाताना स्वतःची बाटली सोबत ठेवा.
पावसात स्टॉलवर मिळणारे भेळ, पाणीपुरी, चायनीज पदार्थ फारसे सुरक्षित नसतात. अशा अन्नामुळे पोट बिघडू शकतं. त्यामुळे घरात शिजवलेलं, स्वच्छ आणि पोषणमूल्य असलेलं अन्नच द्या.
मुलांना हात स्वच्छ धुण्याची सवय लावा. जेवणापूर्वी, शौचालयानंतर आणि बाहेरून आल्यानंतर. गरज असल्यास त्यांना सोबत सॅनिटायझरही द्या.
उरलेले, थंड अन्न टाळा. दमट हवामानात बॅक्टेरिया वेगाने वाढतात आणि केवळ गरम केल्याने ते नेहमी नष्ट होत नाहीत. शक्यतो ताजं शिजवलेलं, गरम अन्न द्या.
बाजारात मिळणारी कापलेली फळं व कच्ची भाजी जंतूंचे स्रोत असू शकतात. मुलांना सॅलड्स आवडत असतील, तर ते घरीच स्वच्छ पाण्यात व थोडं व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा वापरून नीट धुवा.
नखांखाली माती व जंतू साचू शकतात. त्यामुळे मुलांची नखं नियमितपणे कापा आणि ते नखं चावण्याची सवय टाळा. कारण त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
मुलांच्या आहारात संत्री, आवळा, पेरू यासारखी व्हिटॅमिन C ने भरपूर फळं, हिरव्या भाज्या आणि ताक, दही यासारखे प्रोबायोटिक्स समाविष्ट करा.