Monika Shinde
गर्भधारणेदरम्यान आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
संतुलित आहार, पर्याप्त झोप आणि नियमित व्यायाम यांना विशेष महत्त्व आहे. यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात.
दररोज थोडं चालल्यास रक्तप्रवाह सुधारतो आणि थकवा कमी होतो.
हा व्यायाम पाठीसाठी फायदेशीर आहे. यामुळे पाठदुखी व कंबरदुखी कमी होते आणि श्वासोच्छवास सुधारतो.
पाण्यात व्यायाम केल्याने शरीरावरचा ताण कमी होतो. संधीवाताचा त्रास होत नाही आणि शरीर थंड राहतं.
हा व्यायाम पेल्विक स्नायूंना बळकट करतो आणि प्रसूतीसाठी शरीर तयार करतो.