Aarti Badade
लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या किडनीच्या कॅन्सरला वैद्यकीय भाषेत 'विल्म्स ट्यूमर' म्हटले जाते. हा आजार प्रामुख्याने २ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो.
Childhood Kidney Cancer
Sakal
पहिले लक्षण म्हणजे मुलाच्या पोटात अचानक आलेली सूज किंवा गाठ. अनेकदा अंघोळ घालताना किंवा खेळताना पालकांना ही गाठ जाणवते. सुरुवातीला यात कोणतीही वेदना होत नाही.
Childhood Kidney Cancer
Sakal
अनेक पालक या गाठीला बद्धकोष्ठता किंवा साधी पोटफुगी समजून दुर्लक्ष करतात. सूज किंवा कडकपणा कायम राहत असेल, तर ती साधी समस्या नसून ट्यूमरचा संकेत असू शकतो.
Childhood Kidney Cancer
Sakal
हवामान बदल किंवा व्हायरल संसर्गाशिवाय जर मुलाला सतत किंवा वारंवार ताप येत असेल, तर ते चिंतेचे कारण असू शकते. मुलांमध्ये थकवा, भूक न लागणे आणि सतत अशक्तपणा जाणवतो.
Childhood Kidney Cancer
Sakal
मुलांच्या लघवीतून रक्त येणे किंवा लघवीचा रंग किंचित गुलाबी दिसणे हे एक गंभीर लक्षण आहे. अनेकदा याला साधे युरिन इन्फेक्शन समजले जाते, परंतु तपासणी करणे गरजेचे आहे.
Childhood Kidney Cancer
Sakal
काही मुलांना धावताना किंवा खेळताना पोटात किंवा कंबरेच्या मागच्या बाजूला सतत वेदना होतात.
Childhood Kidney Cancer
Sakal
ट्यूमरचा आकार वाढून किडनीवर दबाव पडल्यामुळे काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये लहान मुलांचा रक्तदाब (High BP) देखील वाढतो.
Childhood Kidney Cancer
Sakal
लक्षणे सुरुवातीला अतिशय सौम्य असतात. पालकांनी मुलांच्या शरीरातील बदलांवर बारकाईने लक्ष ठेवल्यास हा आजार ९० टक्क्यांपर्यंत पूर्णपणे बरा होऊ शकतो.
Childhood Kidney Cancer
Sakal
Foods to cool stomach in summer
Sakal