मोठ्यांचं वागणं पाहून मुलं शिकतात 'या' 7 गोष्टी, तेही नकळत!

Monika Shinde

मुलं सतत काहीतरी शिकत असतात

मुलं सतत काहीतरी शिकत असतात. पुस्तकांमधून, खेळातून, शाळेतून. पण सर्वात खोलवर शिकवण मिळते ती आपल्या घरातल्या मोठ्यांकडून. आपण जे करतो, जसं बोलतो, जसं वागतो

तणाव कसा हाताळायचा

अडचण आली, उशीर झाला, अचानक खर्च वाढला अशा वेळी तुम्ही शांत राहता की उधळून देता? लक्षात ठेवा, मुलं तुमचं वागणं पाहून शिकतात. रागावून हातपाय आपटणं शिकवायचं नसेल, तर स्वतः शांत राहा तेच त्यांना घेणं योग्य वाटेल

आदर

घरी काम करणारे कर्मचारी, डिलिव्हरी करणारे लोक, हॉटेलमधले वेटर, किंवा अगदी तुमचा जोडीदार तुम्ही त्यांच्याशी कसा वागता हे पाहून मुलं ‘आदर’ म्हणजे काय ते शिकतात.

भावना मोकळ्या करणे

मुलं लक्ष देऊन पाहतात तुम्ही राग आल्यावर गप्प बसता की आरडाओरडा करता? दु:ख झालं की बोलून मोकळं होता की स्वतःमध्ये बंद होता? त्यांच्या व्यक्त होण्याची शैली तुमच्या वागण्यावर आधारित असते.

प्रामाणिकपणाचं महत्त्व

एखादी चूक लपवणं, थोडं खोटं बोलून वेळ निभावणं या छोट्या गोष्टींचा मोठा परिणाम होतो. मुलं शिकतात की खरं बोलणं जास्त महत्त्वाचं की आपली सोय?

स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन

तुम्ही सतत तुमच्या वजनाबद्दल, त्वचेबद्दल किंवा दिसण्याबद्दल तक्रारी करत असाल, तर मुलं हे ऐकून आपल्याबद्दलही असं विचारायला लागतात. आत्ममूल्य केवळ दिसण्यावर नाही, हे समजवण्यासाठी स्वतःचं उदाहरण महत्वाचं असतं.

चुका मान्य करणे

तुम्ही जर कधी मुलांवर चुकीचा राग काढलात, आणि त्यानंतर माफी मागितली, तर ते त्यांच्या मनावर खोल परिणाम करतं. ‘सॉरी’ म्हणणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, हे तुम्ही दाखवलं पाहिजे.

कामात सातत्य आणि जबाबदारी

तुम्ही नियमितपणे घरातील कामं करता का? वेळेवर काम पूर्ण करता का? तुमची कामाची शिस्त मुलांमध्ये थेट उतरते. कधी वाटतंही नाही, पण तुम्हीच त्यांचं 'आदर्श वर्तनपुस्तक' आहात.

तुमची चपाती आता बनेल सुपरफूड! जाणून घ्या 6 स्मार्ट हेल्दी ट्विस्ट

येथे क्लिक करा