Aarti Badade
दोन हापूस आंबे घेऊन त्याचा रस काढा किंवा छोटे तुकडे करा.
मिक्सरमध्ये आंबा रस, अर्धा कप दूध आणि 1-2 टेबलस्पून साखर घालून छानपैकी मिक्स करून गोडसर मँगो मिल्कशेक तयार करा.
सर्व्हिंग ग्लासमध्ये सर्वप्रथम बारीक चिरलेले आंब्याचे तुकडे घाला.
त्यावर हळूहळू बनवलेला मँगो मिल्कशेक ओता आणि थोडावेळ थंड होऊ द्या.
आता त्यावर 1-2 स्कूप मँगो आईसक्रीम घाला.
वरून काजू, बदाम, पिस्ता, टुटी फ्रुटी आणि चेरीने सजवा.
आता ही गार आणि मनमोहक मॅंगो मस्तानी सर्व्ह करा – जणू सौंदर्य आणि स्वादाचा संगम!