Aarti Badade
शिल्लक राहिलेल्या चपात्या घ्या आणि बनवा झटपट अगळा वेगळा नाश्ता.
भाजणीचे पीठ, हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट, मसाला, चिंचेचा कोळ, गूळ आणि मीठ एकत्र करून चविष्ट मिश्रण तयार करा.
एका चपाटीवर मिश्रण पसरवा, दुसरी चपाती ठेवून पुन्हा मिश्रण लावा आणि आळूवडीसारखी गुंडाळी करा.
अशा दोन गुंडाळ्या तयार करून त्यांना मधोमध चिरा मारा.
कुकरमध्ये जाळी ठेवून त्यावर गुंडाळ्या ठेवा आणि झाकण घालून १० मिनिटे वाफवून घ्या.
थोड्या वेळ थंड झाल्यावर त्या गुंडाळ्यांच्या छोट्या वड्या कापा.
वड्या शॅलोफ्राय किंवा डीप फ्राय करा. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.