Aarti Badade
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलांना द्या एक मजेशीर, थंड आणि गोडसर सरप्राइज! त्यांना शिकवा 'जिरा बटर दही वडे' बनवायला.
यासाठी लागेल: १ छोटे जिरा बटर, ½ लिटर दही, १ टीस्पून लाल मिरची पूड, १ टीस्पून धने-जिरे पूड, ½ टीस्पून मिरे पूड, २ टेबलस्पून साखर आणि १ टीस्पून मीठ.
सजावटीसाठी २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेव तयार ठेवा.
एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात जिरा बटर ५-७ मिनिटे भिजवून ठेवा.
भिजवलेले बटर पाण्यातून बाहेर काढून दुसऱ्या बाऊलमध्ये ठेवा.
दही चांगले फेटून घ्या. त्यात साखर, मीठ, मिरची पूड, धने-जिरे पूड आणि मिरे पूड घालून चांगले मिक्स करा.
हे फेटलेले दही भिजवलेल्या बटरवर ओता आणि हलक्या हाताने मिक्स करा.
वरून कोथिंबीर आणि शेव टाका.
थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा. थंडगार झाल्यावर सर्व्ह करा!