Aarti Badade
लोहाच्या (Iron) कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो. कोणत्या गटांना याचा सर्वाधिक धोका असतो, ते पाहूया.
फक्त वनस्पतीजन्य आहार घेतल्याने लोह कमी मिळते. यासाठी बीन्स आणि फोर्टिफाइड तृणधान्ये खावीत.
ऑयस्टर, सामन, सार्दिन, आणि झिंगे हे लोहाचे चांगले स्रोत आहेत. अशा अन्नाचा आहारात समावेश करावा.
मासिक पाळीमुळे शरीरातून लोह कमी होते. त्यामुळे महिला आणि किशोरवयीन मुलींना अॅनिमियाचा धोका जास्त असतो.
वारंवार रक्तदान केल्याने शरीरातील लोह साठा कमी होतो. त्यामुळे रक्तदानानंतर लोहयुक्त आहार घेणे महत्त्वाचे आहे.
अकाली जन्मलेली किंवा कमी वजनाची बाळं या धोक्याच्या गटात येतात. त्यांना विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
आईच्या दूधात लोह कमी असेल, तर बाळाला लोहयुक्त फॉर्म्युला दूध द्यावे लागू शकते.
लहान मुलांची शारीरिक वाढ जलद होते, त्यामुळे त्यांना लोहाची गरज जास्त असते.
अॅनिमिया टाळण्यासाठी लोहयुक्त आहार घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्या आणि नियमित तपासण्या करा.