चीन देशाचं जुनं नाव काय होतं? ‘या’ राजवंशामुळे पडले देशाला चीन नाव!

Aarti Badade

चीनचं जुनं नाव काय होतं?

आज जगातील प्रभावशाली देशांपैकी एक असलेल्या चीनचा इतिहास अतिशय जुना आहे. मात्र, या देशाला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जायचे, हे अनेकांना माहीत नाही.

Old Name of China

|

Sakal

‘झोंगगुओ’ नावाचा अर्थ काय?

चीनला चिनी भाषेत ‘झोंगगुओ’ (Zhongguo) असे म्हटले जाते. या शब्दाचा अर्थ ‘मध्यवर्ती राज्य’ किंवा ‘मध्यवर्ती देश’ असा होतो.

Old Name of China

|

Sakal

‘झोंगहुआ’ हे नावही प्रचलित

चीनसाठी ‘झोंगहुआ’ (Zhonghua) हा शब्ददेखील वापरला जातो. चिनी संस्कृती आणि ऐतिहासिक ओळख दर्शवणाऱ्या या नावाला विशेष महत्त्व आहे.

Old Name of China

|

Sakal

‘किन’ राजवंशाशी चीनचा संबंध

चीन या नावाचा उगम प्राचीन ‘किन’ (Qin) राजवंशाशी जोडला जातो. इ.स.पूर्व २२१ मध्ये किन राजवंशाचा राजा किन शी हुआंग याने विविध राज्ये एकत्र करून एकसंध साम्राज्य स्थापन केले.

Old Name of China

|

Sakal

किन राजवंशामुळे मिळाली ओळख

किन राजवंशाच्या नावाचा उच्चार वेगवेगळ्या भाषांमध्ये बदलत गेला. याच नावातून पुढे ‘चीन’ या शब्दाची निर्मिती झाल्याचे मानले जाते.

Old Name of China

|

Sakal

पाश्चात्त्य देशांपर्यंत पोहोचले नाव

प्राचीन काळात व्यापारी आणि प्रवाशांच्या माध्यमातून या प्रदेशाची ओळख इतर देशांपर्यंत पोहोचली. ‘किन’ या नावाची विविध भाषांतील रूपे बदलत गेली आणि ‘चीन’ हे नाव प्रचलित झाले.

Old Name of China

|

Sakal

नावामागे दडलेला हजारो वर्षांचा इतिहास

आज चीनची ओळख जागतिक स्तरावर वेगळी असली, तरी त्याच्या नावामागे प्राचीन किन राजवंशाचा इतिहास जोडलेला आहे. त्यामुळे ‘चीन’ हे नाव केवळ भौगोलिक ओळख नसून ऐतिहासिक वारशाचीही आठवण करून देते.

Old Name of China

|

Sakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते?

Chhatrapati Shivaji Maharaj Sword Name

|

Sakal

येथे क्लिक करा