महाराष्ट्रातील 'हे' गाव भुतांसाठी रिकामं केलं जातं?

Aarti Badade

तीन दिवस गावात असते शुकशुकाट!

कोकणातील चिंदर गावात वर्षातून तीन दिवस अशी परंपरा पाळली जाते, ज्यावेळी संपूर्ण गावातील ग्रामस्थ गावाबाहेर राहतात.

Chindar Village

|

Sakal

घरं आणि दुकानं राहतात बंद!

या तीन दिवसांत गावातील घरं, दुकानं बंद असतात आणि गावात एकही व्यक्ती थांबत नसल्याचं सांगितलं जातं.

Chindar Village

|

Sakal

काय आहे या परंपरेचं नाव?

स्थानिक पातळीवर या प्रथेला 'गावपाळण' असं म्हटलं जातं, जी अनेक वर्षांपासून श्रद्धेने पाळली जात असल्याचं सांगितलं जातं.

Chindar Village

|

Sakal

देवता आणि आत्म्यांच्या वास्तव्याची मान्यता!

स्थानिक समजुतीनुसार, या तीन दिवसांत गावात देवता आणि आत्म्यांचं वास्तव्य असतं, त्यामुळे ग्रामस्थ गावाबाहेर राहणं पसंत करतात.

Chindar Village

|

Sakal

एका शक्तिशाली डुकराची आख्यायिका!

गावातील प्रचलित आख्यायिकेनुसार, पूर्वी या परिसरात एका शक्तिशाली डुकराचा आणि त्याच्यासोबत असलेल्या आत्म्यांचा वावर होता, ज्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते.

Chindar Village

|

Sakal

ग्रामदेवता रावलनाथ यांना घातलं साकडं!

या संकटातून सुटका व्हावी म्हणून ग्रामस्थांनी ग्रामदेवता रावलनाथ यांची प्रार्थना केली, अशी या परंपरेमागील लोककथा सांगितली जाते.

Chindar Village

|

Sakal

तीन दिवसांनंतरच गावात प्रवेश!

आख्यायिकेनुसार, रावलनाथ देवतेसोबत झालेल्या करारामुळे आत्म्यांना वर्षातील तीन दिवस गावात राहण्याची परवानगी मिळाली आणि त्यानंतर पुजाऱ्यांची परवानगी घेऊन ग्रामस्थ पुन्हा गावात प्रवेश करतात.

Chindar Village

|

Sakal

मुघल काळातील बागांची रचना कशी असायची?

Mughal Garden Architecture

|

Sakal

येथे क्लिक करा