मोबाईलची बॅटरी थंडीत लवकर का संपते?

संतोष कानडे

मोबाईल

हिवाळ्यात किंवा अतिथंड वातावरणात मोबाईलची बॅटरी नेहमीपेक्षा लवकर संपल्याचे अनेकांना जाणवते.

लिथियम-आयन बॅटरी

यामागचे मुख्य कारण म्हणजे मोबाईलमध्ये वापरली जाणारी लिथियम-आयन बॅटरी.

रासायनिक प्रक्रिया

या बॅटरीमध्ये रासायनिक प्रक्रियेद्वारे विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. तापमान कमी झाल्यावर बॅटरीमधील रासायनिक प्रक्रिया मंदावते.

लिथियम आयनची

त्यामुळे बॅटरीमधील लिथियम आयनची हालचालही संथ होते. परिणामी, बॅटरीची ऊर्जा पुरवण्याची क्षमता तात्पुरती कमी होते.

फोन

अशा वेळी मोबाईलची बॅटरी अचानक कमी झाल्यासारखी दिसू शकते किंवा फोन बंदही पडू शकतो.

क्षमता

मात्र, थंडीमुळे बॅटरीची क्षमता कमी होणे अनेकदा तात्पुरते असते.

तापमान

मोबाईल सामान्य तापमानात आणल्यानंतर बॅटरीची कामगिरी पुन्हा सुधारू शकते.

उबदार

त्यामुळे थंडीत मोबाईल उबदार ठिकाणी ठेवणे फायदेशीर ठरते; मात्र तो थेट हीटर किंवा गरम वस्तूजवळ ठेवू नये.

घरात पाळण्यासाठी सर्वात चांगला कुत्रा कोणता?

<strong>येथे क्लिक करा</strong>